पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय

पारगावच्या शिंदेवाडीतील युवकांची भावना राहुल कुलच करू शकतात दौंड तालुक्याचा विकास

तांबे कुटुंबातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, राजाराम तांबे यांना धक्का

पारगाव दि. ०६ (टीम बातमीपत्र) पारगाव शिंदेवाडी येथील युवक आणि नागरिकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या राजाराम तांबे यांना धक्का मानला जात आहे.

राजाराम तांबे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या पारगावच्या शिंदेवाडी मधील संभाजी तांबे, कानिफनाथ तांबे, अनिल तांबे, सुनील तांबे, बाळासाहेब तांबे, धनंजय तांबे, संजय शिंदे, लव्हजी काळे, गणेश पन्हाळे, अथर्व तांबे, राज जेधे, संदीप शिंदे, सोहम भोसले, विजय तांबे, अशोक काळे, संतोष काळे, दीपक काळे, रवी काळे, महेंद्र शिंदे, चंद्रकांत तांबे, सुजल चव्हाण, आदित्य तांबे, नवनाथ काळे, संतोष तांबे या युवकांनी आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मराठा समाजातर्फे रिंगणात असलेले राजाराम तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत आपला पाठिंबा महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांना दिला होता त्यानंतर दुसऱ्या दिवशी तांबे परिवारातील युवकांनी महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांच्याबरोबर प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने तांबे यांना हा धक्का मानला जात आहे

Related Articles

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!