ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची श्रद्धांजली
राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई (BS24NEWS) :- बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वां ज्येष्ठ उद्योगपती ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन दुःखदायक आहे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय उद्यमी जगतावर आपला प्रभाव टाकला. भारतीय सर्वसामान्य माणूस व मध्यमवर्गीय कुटुंबाचे परवडणाऱ्या सुखद प्रवासाचे स्वप्न राहुल बजाज यांनीच सर्वप्रथम प्रत्यक्षरूपात आणलं. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
भारतीय प्रवासी संकल्पनेत तसेच तरुण उद्योजकांमध्येही ‘हमारा बजाज’ हे अविभाज्य अंग म्हणून समोरे आले. बजाज कुटुंबीयांप्रति सहसंवेदना व्यक्त करतो. राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही श्री वळसे पाटील यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.
राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे – उद्योगमंत्री सुभाष देसाई
ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. अशा शब्दात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
श्री देसाई आपल्या शोक संदेशात म्हणतात, राहुल बजाज यांना महाराष्ट्राचे उद्योगमहर्षिच म्हटले पाहिजे. त्यांनी केलेला उद्योग विस्तार सर्वांना अचंबित करणारा आहे. स्व. कमलनयन बजाज यांनी सुरू केलेल्या या उद्योगाच्या गंगोत्रीचे राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळामध्ये मोठ्या गंगेत परिवर्तन केले. त्यांनी त्यांच्या उद्योगाचा विस्तार करताना अनेक लघुउद्योजकांची निर्मिती केली. त्यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मैत्रीचे संबंध होते. राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगाचा जास्तीत जास्त विस्तार महाराष्ट्रात केला याबद्दल खरोखरच त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!