दौंड शहरातुन जाणाऱ्या महामार्गावर वाहतेय गटारगंगा
स्त्यावरच गटर लाईनच्या चेंबर मधुन घाण पाणी रस्त्यावर
दौंड (BS4NEWS): दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड – बेळगाव महामार्गावरील रस्त्यावरच गटर लाईनच्या चेंबर मधुन घाण पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे सायकल , मोटारसायकल वरून ये -जा करणारे नागरीक , विद्यार्थी यांना या घाण पाण्यातूनच ये – जा करावी लागत आहे.यामध्ये सायकल आणि मोटरसायकलवरून प्रवास करणाऱ्यांच्या अंगावर घाण पाणी उडत असुन त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या महामार्गावरील याच चेंबर मधुन नेहमीच पाणी बाहेर येत असते. व याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर कायमसवरूपी चा उपाय करण्यासाठी रस्ते ठेकेदार व नगरपालिका पुढे येत नाही . त्यामुळे ही बाब दौंडकर नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मागील काही दिवसांपुर्वी या चेंबरमुळेच एका तरुणाला आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली आहे असे असतानाही रस्ते महामार्ग, ठेकेदार आणि नगरपालिका प्रशासन हे याकडे डोळझाक करित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
याबाबत नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी कापरे यांच्याशी भ्रमणधवनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, याबाबत सोमवारी माहिती घेतो आणि ज्या सुविधा करता येतील याचा प्रयत्न करतो.
याबाबत रस्ते बनविणाऱ्या कंपनीच्या मॅनेजरशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.