सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ‘सी4आय4’ लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन
पुणे (प्रतिनिधी)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उभारण्यात आलेल्या ‘सेंटर फॉर इंडस्ट्री ४.०’ (सी4आय4 लॅब) येथील ‘एसएमई प्रॉडक्ट डेव्हलपमेंट अँड अनँलिटीक्स लॅब’चे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी, किर्लोस्कर उद्योग समूहाचे उद्योगपती राहुल किर्लोस्कर, कुलगुरू डॉ.नितीन करमळकर, लॅबचे संचालक दत्तात्रय नवलगुंदकर आदी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या ‘समर्थ’ उद्योग कार्यक्रमांतर्गत इंडस्ट्री.4 ला गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 5 केंद्रामध्ये ‘सी4आय4’ लॅबचा समावेश आहे. ही लॅब उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी अनुभव केंद्र म्हणून खुले होत आहे. उद्योगांना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी या लॅबमध्ये विश्लेषण आणि उत्पादन विकासच्या अनुषंगाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त साधने ठेवण्यात आली आहेत, असे यावेळी सांगण्यात आले.