मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांचे संत रविदास महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन
मुंबई, (BS24NEWS)– संत रविदास महाराज यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मुख्यमंत्री अभिवादनात म्हणतात, संत रविदास हे समाज सुधारक होते. त्यांनी आपल्या काव्यातून सामाजिक विषमता, वाईट चालीरिती यावर परखड मत मांडले. त्यांनी मानवतावादाचा पुरस्कार केला. समता – बंधुता आणि एकात्मता याविषयीचे त्यांचे विचार आजही मार्गदर्शक असे आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सरोज अहिरे, आमदार संजय दौंड, आमदार यशवंत माने, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव इंद्रा मालो आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.