जिल्हा दूध संघासाठी दौंड मधून राष्ट्रवादीची उमेदवारी वरवंडच्या राहुल दिवेकर यांना निश्चित.. सागर फडके यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष
दौंड भाजपा वेट अँड वॉचच्या भूमिकेत..
दौंड (BS24NEWS) पुणे जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (कात्रज डेअरी) संचालक मंडळाच्या निवडणुकीत दौंड तालुक्यातून राहुल दिवेकर यांना पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासो पवार यांनी सांगितले.
तालुक्यातील जिल्हा दुध संघाला निवडणू द्यायच्या जागेसंदर्भात कोणत्या इच्छुकाला राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी द्यायची ? यासाठी पक्षाच्या वतीने सोमवारी (दि. १४ फेब्रुवारी) खुटबाव येथे मतदान घेण्यात आले. यामध्ये जास्तीच्या लोकांचा कल हा राहुल दिवेकर यांच्याकडे होता त्यामुळे त्यांना आज पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासो पवार यांनी दिली.
पुणे जिल्हा दूध संघाची निवडणूक २१ मार्च रोजी होत असून उद्या (दि.१८) रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
या निवडणुकीसाठी तालुका मतदार संघातून राहुल दिवेकर, सागर फडके, पोपटराव ताकवणे हे इच्छुक आहेत. यामधे फडके आणि दिवेकर तीव्र इच्छुक आहेत. तसेच मागासवर्गीय मतदार संघातून रामभाऊ टुले हे ही तीव्र इच्छुक आहेत.
दरम्यान, जिल्हा दुध संघाच्या निवडणूकीत तालुक्यात भाजपा हा बघ्याच्या भूमिकेत असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने त्यातील कोणी बंड केल्यास त्या नाराज इच्छुकास भाजपा मदत करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अर्ज दाखल केल्यानंतर ही काही घडामोडी घडुन या निवडणूकीत रंगत येण्याची शक्यता आहे. एकंदरीतच राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी स्पर्धा जरी असली तरी भाजपही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहे.