शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करा- पोलीस निरीक्षक नारायण पवार
राहू (BS24NEWS)
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करावी अशा प्रकारचे अहवान यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केले.
यवत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या सर्व गावातील सरपंच,पोलिस पाटील व शिवभक्त यांची सामुदायिक बैठक घेऊन पवार यांनी शिवजयंती बाबत मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आपणा सर्वांचे आराध्य दैवत आहे. त्यांची जयंती आपण दरवर्षी उत्साहात साजरी करतो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना विषाणूचा फैलाव वाढल्यामुळे शिवजयंती साजरी करण्यास अडथळे आले. मात्र यंदा कोरोना चा फैलाव थोडासा कमी असला तरी राज्य शासनाने दिलेल्या नियमावलीनुसार शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात यावी. तसेच शिवजयंती साजरी करत असताना सार्वजनिक मिरवणूक न काढता, एकाच ठिकाणी गर्दी न करता शिवरायांना अभिवादन करावे.
तसेच शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक केशव वाबळे व सुजित जगताप उपस्थित होते.