दौंड शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
युवा कार्यकर्ते तालिब शेख व तू खुश रहे ग्रुपच्या वतीने अन्नदान
दौंड (BS24NEWS) दौंड येथे विविध उपक्रमांनी शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहारातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पुतळ्याची सजावट करण्यात आली होती. दौंडचे तहसिलदार संजय पाटील, पोलिस निरिक्षक विनोद घुगे, उपमुख्याधिकारी सुप्रिया गुरव यांनी शासनाच्या वतीने पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.
शिवजयंती निमित्ताने १६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी ३ दिवसीय परिवर्तन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दीपक शिकारपूर, मकरंद टिल्लू व डॉ. गिरिष जखोटिया यांची व्याख्याने झाली. शिवकालीन वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात स्पर्धेस मोठा प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धामध्ये प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांची नावे पुढीप्रमाणे
(गट पहिला)
प्रथम – सर्वेश किरण शेळके, द्वितीय – पियुष आढाव, तृतीय – तन्वी तन्मय पवार
(गट दुसरा)
प्रथम- आयुष आढाव, द्वितीय – ओम भुमकर, उत्तेजनार्थ – पृथ्वीराज पानसरे, उत्तेजनार्थ -स्वरूप पोळ,
(गट तिसरा)
प्रथम- पृथ्वीराज जगताप, द्वितीय – उर्मिला भोसले
(गट चौथा )
प्रथम – अनुष्का पानसरे, द्वितीय – स्वरा पोळ, तृतीय – गायत्री देशमुख, उत्तेजनार्थ वेदांत लगड
(खुला गट) सतीश पाचपुते
शहरालगतच्या गावातून हाती भगवे झेंडे घेऊन शिवभक्त मोठ्या संख्येने दौंड शहरात दाखल झाले होते. “छत्रपती शिवाजी महाराज कि जय” या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघ रोटरी क्लब ऑफ दौंड व शिवस्मारक समितीच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
युवा कार्यकर्ते तालिब शेख व तू खुश रहे ग्रुपच्या वतीने अन्नदान
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मिरवणुकीत सहभागी झालेल्या कार्य्कार्त्यांच्यासाठी तालिब शेख व तू खुश रहे ग्रुप यांच्यावतीने अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता .