पाटसच्या वसंत साळूकेंचा शिवसंग्राम मध्ये प्रवेश
पाटस (BS24NEWS) शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांच्या शिव संग्रामला साथ देण्याचे ठरवत शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मेटे यांच्या उपस्थितीत शिवसंग्रामच्या आमदार सौ. डॉ. भारती लव्हेकर, प्रदेश अध्यक्ष तानाजी शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष राजनजी घाग यांच्या मुंबई येथे पक्षाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत राज्य स्तरीय मेळाव्यात पाटसचे वसंत विनायक साळुंखे यांनी नुकताच प्रवेश केला आहे.
साळुंके यांची महाराष्ट्र प्रदेश शिवसंग्राम संघटनेच्या बारामती, इंदापूर, दौंड या विधानसभा क्षेत्राचे पुणे जिल्हाध्यक्षपदी तर संजय विठ्ठल शिंदे यांची दौंड तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे. अनेक वर्षांपासून शैक्षणिक सामाजिक जीवनात काम करत असताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिलो आहे. शिव संग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनायकराव मेटे यांच्या संघर्षमय राजकीय जीवनाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिव संग्राम पक्षाला बळकटी देण्याचा व शिव संग्रामची विचारधारा जनमानसात रुजवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष वसंत साळुंखे यांनी सांगितले.