शेतकरी आणि महावितरणमध्ये पुन्हा संघर्ष होणार ..?
कानगाव येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती
दौंड (BS24NEWS) मागिल काही दिवसांपूर्वीच महावितरण आणि शेतकऱ्यांमध्ये विजबिलावरुन संघर्ष सुरु होता. तो थांबला होता. महावितरण विभागाने शेतकऱ्यांच्या थकित विजबिल वसुली पोटी आत्ता ट्रान्सफॉर्मर बंद करण्यास काल (दि.24) पासुन सुरवात केली आहे. त्यामूळे शेतकरी आणि महावितरणमध्ये पुन्हा संघर्ष उभा राहणार असल्याचे बोलले जात आहे.
मागिल महिनाभरापूर्वीच तालुक्यांतील पुर्व भागातील शेतकऱ्यांच्या विजबील वसुली पोटी महावितरनने शेतकऱ्यांचा शेतातील पॅनेल बॉक्स आणि केबल आणल्या होत्या त्यामुळे शेतकरी आणि महावितरण मध्ये संघर्ष पहायला मिळाला होता. त्यानंतर तालुक्यातील कानगाव येथील शेतकऱ्यांच्या वीजबिल वसुलीपोटी महावितरणने वीजपुरठा करणारी मुख्य तारच कट करत शेतात टाकून दिली होती. त्यामुळे महावितरण आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष होऊन पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाणीपुरवठा योजनेचे साहित्य चोरी करणाऱ्या दोन जणांना अटक, अंधाराचा फायदा घेत चार जण झाले पसार
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत.त्यामुळे पालेभाज्या पिकांना पाण्याची जास्त गरज असते. तसेच काही ठिकाणी फळ पिकांच्या लागवडी सुरू आहेत तर काही ठिकाणी लागवडी पुर्ण झाल्या आहेत. तर गहु पिक उभे आहे अश्यात महावितरणने ट्रान्सफॉर्मर बंद करण्यास सुरवात केल्याने शेतकरयांचे मोठे नुकसान होणार आहे.
पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबवावी – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
याबाबत भाजपा किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर म्हणाले कि, महावितरण विभाग दर दोन तीन महिन्यांनी शेतकर्यांचे ट्रान्सफॉर्मर बंद करणे, कनेक्शन बंद करून शेतकरयांना अडचणीत आणत आहे. महविरण विभागाने शेतकरयांना ज्या नोटिसा पाठवील्या आहेत त्यामध्ये ५ एच पी साठी १० एच पी चे बिल आकारून पाठविल्या आहेत त्यामुळे महावितरण विभाग हा बेकायदेशीर नोटिसा पाठवत असल्याने याविरोधात शेतकऱ्यांशी चर्चा करून आंदोलन उभारणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
ब्रह्मदेव आला असता…तरी सरकार आलं नसतं…
विधानसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करू अशा प्रकारचे आश्वासन महाविकास आघाडी सरकारने जनतेला दिलं होतं. मात्र सध्या शेतकरी अडचणीत आला असताना शेतकऱ्यांची वीज कट करून शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकार मीठ चोळत आहे. जर महाविकास आघाडी सरकारने निवडणुकीमध्ये वीजबिल माफ करण्याचे आश्वासन दिले नसते तर ब्रह्मदेव आला असता तरी त्यांचं सरकार राज्यात आलं नसतं.
बापूसाहेब देशमुख (संस्थापक अध्यक्ष रयत शेतकरी संघटना)