भाजप सरकार आणि ईडी ने केलेल्या कारवाई चा जाहीर निषेध – रमेश थोरात
नबाब मलिकांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रास्ता रोको आंदोलन
पाटस (BS24NEWS)
भारतीय जनता पार्टी ने ईडी च्या माध्यमातून नवाब मलिकां सारख्या एका हुशार आणि आदर्श माणसाला अटक केली आहे . सत्तेचा गैरवापर तरी किती करायचा याचा विचार केला पाहिजे आहे .भाजप सरकार आणि ईडी ने केलेल्या कारवाई चा जाहीर निषेध करतो असे मत दौंड चे माजी आमदार रमेश थोरात यांनी बोलताना व्यक्त केले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अटकेच्या निषेधार्थ आज पाटस टोल नाक्यानजीक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रस्ता रोको आंदोलन आंदोलन करण्यात आले यावेळी रमेश थोरात बोलत होते .
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करते वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .यावेळी अरे भाजप हमसे डरती है ,इडी को आगे करती है , ….नही चलेगी नही चलेगी भाजप शाही नही चलेगी, …गांधी लढे थे गोरोसे , हम लढेंगे चोरो से अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार , वैशाली नागवडे , पांडुरंग मेरगळ , केशव दिवेकर यांसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनावेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
आंदोलना वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांसह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .