कृषीपुणे जिल्हा ग्रामीणराज्य

महावितरण कडून विद्युत रोहित्रे बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत तिव्र नाराजी

थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तर सरकारने शेतकऱ्यांचा छळ थांबवावा. भाजपा किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष वासुदेव काळे

पाटस (BS24NEWS) वीज बिलांच्या कारणास्तव महावितरण कडून  विद्युत विद्युत ट्रांसफार्मर बंद करण्यात येत आहेत . यामुळे शेती पंपांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे . यामुळे  पाटस परिसरातील शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत . कडक उन्हात पिकांना पाणी देता येणार नसल्याने पाण्याअभावी पिके जळून जाण्याची शक्यता आहे . वीज पुरवठा सुरू झाला नाही तर शेतकऱ्यांच्या हाताशी आलेला घास हिरावून घेतला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजप सरकार आणि ईडी ने केलेल्या कारवाई चा जाहीर निषेध – रमेश थोरात

शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने आणि आर्थिक खर्च करुन काकडी, कलिंगड, खरबूज , द्राक्ष , पालेभाज्या अशी उन्हाळी नगदी पिके आणि डाळींब ,ऊस यांसारखी पिके जगवली आहेत. या पिकांतून चांगले आर्थिक उत्त्पन्न मिळण्याची आशा शेतकरी बांधवाना आहे . सध्या कडक उन्हाचे दिवस असल्याने शेती पिकांना सातत्याने पाणी देण्याची गरज पडत असते. परंतु शेतकऱ्यांनी वीज बिले भरली नसल्याने वीज वितरण कंपनीकडून विद्युत ट्रान्सफार्मर बंद करण्यात येत आहेत. विद्युत ट्रांसफार्मर बंद करण्यात येत असल्याने विद्युत पंपांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे .यामुळे शेतातील पिकांना पाणी द्यायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यां समोर उभा राहिला आहे .या पिकांना वेळेत पाणी मिळाले नाही तर पिके जळून जाण्याची शक्यता आहे . पिके जळाली किंवा पिकांचे पाण्याअभावी नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभा राहण्याची शक्यता आहे .

शेतकरी गेल्या दोन वर्षाच्या काळात कोरोना सारख्या महामारी मुळे अडचणीत आहे  , हजारो कुटुंबे कोरोनाच्या  महामारी मुळे अडचणीत आली , कोरोना काळात ज्या शेतकऱ्याने समाजव्यवस्था सावरण्याचे काम केलं त्या शेतकऱ्याच्या पाठीशी उभा न राहता हे सरकार शेतकऱ्याला वीज कनेक्शन कपात करून  गळफास द्यायचं  काम करायला लागले आहे.  तरी  थोडीफार नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी हे थांबवावे
वासुदेव काळे, प्रदेश अध्यक्ष भाजपा किसान मोर्चा 

अचानक विद्युत ट्रान्सफार्मर बंद करणे अन्यायकारक आहे. पूर्व सूचना देऊन, योग्य तेवढी मुदत देऊन महावितरण कंपनी ने हा विषय सौजन्याने सोडवावा.  शेतकऱ्यांची शेतातील कामे सुरू आहेत , शेती पिकांना पाणी देणे आवश्यक आहे . अशा वेळी अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जाऊ शकतो.
नितीन शितोळे देशमुख, शेतकरी पाटस 

शेतकरी आणि महावितरणमध्ये पुन्हा संघर्ष होणार ..?

शेतकऱ्यांनी बीजबिले भरली नसल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत आहे .याबाबत फेब्रुवारी च्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना नोटीस देखील पाठवण्यात आल्या आहेत. 31 मार्च रोजी 2022 च्या आत शेतकऱ्यांनी विजबिलाचे पैसे भरले नाही तर  कृषी धोरण  2020 या योजने नुसार शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यात 67 % पर्यंत सूट आहे ती 20 % पर्यंत कमी होईल .यामुळे शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या भरणा रक्कमेत वाढ होईल. या धोरणा नुसार  शेतकऱ्यांनी चालू विजबिले भरणे आवश्यक होते . परंतु शेतकऱ्यांनी बिले भरलेली नाहीत .कंपनीची आर्थिक परिस्थिती डबघाईला अली असल्याने शेतकऱ्यांनी विजबिले भरून सहकार्य करावे.

महेश धाडवे, उप कार्यकारी अभियंता , विद्युत वितरण कंपनी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!