शेतकऱ्यांची वीजतोडणी व वीजबिल वसुली थांबविण्यासाठी भाजपाचा महावितरणवर मोर्चा..
मोर्चासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे माऊली ताकवणे यांचे आवाहन
केडगाव (BS24NEWS) शेती पंपाची सक्तीची विज बील वसुली थांबवुन शेतकऱ्यांचे संपुर्ण विज बील माफ करणे व खंडित केलेला विज पुरवठा ताबडतोब पूर्ववत करणे या मागण्यांसाठी दौंड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने (दि. २ मार्च) रोजी केडगाव (दापोडी) महावितरण कार्यालय मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी दिली आहे.
महावितरण कडून विद्युत रोहित्रे बंद करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांत तिव्र नाराजी
दोन दिवसांत शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सुरळीत न केल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची सूचना दौंड तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष माऊली ताकवणे यांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी केडगाव विभागाचे उप अभियंता राजेंद्र एडके यांना निवेदन देऊन दिली होती. मोर्चासाठी तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ताकवणे यांनी केले आहे.