वीजबिल भरा ,कारवाई टाळा — कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके
राहू (BS24NEWS)
नियमित वीजबिल भरणार्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी वीजबिल भरा व कारवाई टाळा असे आवाहन महावितरणचे केडगाव विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांनी केले.
सद्या दौंड व शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन महावितरण च्या अधिकाऱ्याकडून दिले असल्याचा मेसेज सोशल मिडियावर फिरत आहे.
त्याबाबत कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, सद्या सोशल मिडियावर फिरत असलेला मेसेज हा ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे. नियमित वीजबिल भरणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार नाही. उलट ज्या ग्राहकांची वीजबिले थकीत आहेत त्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात येणार आहे.त्यामुळे ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरून सहकार्य करणे गरजेचे आहे.वीजबिल भरण्याला दौंड व शिरूर तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.