जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दौंड तालुक्यातील इच्छुकांना राष्ट्रवादी काँग्रेस ने दाखवला कात्रजचा घाट
दौंड (BS24NEWS) जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी दौड तालुक्यातील इच्छुकांना कात्रजचा घाट दाखविल्याचे दिसून आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पुणे जिल्हा दूध संघासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या घोषणा केल्या असून अ गटातून राहुल दिवेकर यांची उमेदवारी वगळता बाकीच्या इच्छुक उमेदवारांचे पत्ते कापण्यात आले आहेत हे या यादीवरून दिसत आहे
तालुक्यातून महिला राखीव मधून महानंद च्या माजी अध्यक्ष वैशाली नागवडे अ गटातून इच्छुक असणारे सागर फडके यांच्या मातोश्री इतर मागास प्रवर्ग मधून इच्छुक असणारे प्रकाश भागवत पत्नी हे इच्छुक उमेदवार होते
तर मागास प्रवर्गातून प्रकाश भागवत इच्छुक होते
अनुसूचित गटातून या पूर्वी अध्यक्ष राहिलेले रामभाऊ टुले इच्छुक होते तसेच अ गटातून पोपट भाई ताकवणे व सागर फडके हे उमेदवार देखील इच्छुक होते परंतु जिल्हा बँकेच्या निवडणुकी प्रमाणे या निवडणुकीत देखील तालुका गट वगळता इतर इच्छुकांना नाराजीचा सामना करावा लागणार आहे.
तालुक्यातील अ गटातून तीव्र इच्छुक असणारे सागर फडके यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी च रोखण्यात पक्षाला यश आले होते परंतु त्यांच्या उमेदवारी च्या बदल्यात त्यांच्या मातोश्री ना महिला गटातून उमेदवारी देण्यात येईल असा तोडगा काढण्यात आला होता परंतु त्यांना देखील ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली नाही
शिवाय वैशाली नागवडे यांना तरी उमेदवारी मिळेल अशी शक्यता असताना भविष्यात नागवडे संचालक झाल्या तर दूध संघाच्या अध्यक्ष होतील आणि तालुक्यातील नेत्यांना डोईजड होतील म्हणून त्यांना देखील उमेदवारी नाकारण्या साठी मोठी फिल्डिंग लागली होती
वास्तविकता संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकमेव भाजप चे आमदार असणारे राहुल कुल यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ने कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी पदे देण्याचे गरजेचे असताना उलट कार्यकर्ते नाराज कसे होतील याकडे पाहिले जात आहे जिल्हा दूध संघातील नाराजीचा चांगलाच फटका आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत पक्षाला बसू शकतो
जिल्हा बँक आणि त्यानंतर जिल्हा दूध संघ असे सलग दोनवेळा तालुक्यातील इच्छुक उमेदवारांना नाकारले गेल्याने तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दुफळी निर्माण होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही