मोक्याच्या गुन्ह्यात व येरवडा जेलमधुन दोन वर्षे फरार असलेला आरोपी जेरबंद
दौंड पोलिसांची कारवाई
दौंड (BS24NEWS)
मोक्याच्या गुन्ह्यात व येरवडा जेलमधुन पळून गेलेला आरोपी जेरबंद करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.याबाबत अधिक माहिती अशी की ,
दौंड पोलीस स्टेशन महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम ( मोक्का) या गुन्हयामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे या ठिकाणी अटकेत असलेले आरोपी देवगण अजिनाथ चव्हाण (वय २५ वर्षे )(रा. बोरावकेनगर, दौंड ता.दौंड जि. पुणे) , गणेश अजिनाथ चव्हाण (वय २२ वर्षे)( रा. बोरावके नगर, दौंड ता. दौंड जि. पुणे ) ,अक्श्या उर्फ अक्षय कोंडक्या चव्हाण (वय. २२ वर्षे)( रा. माळवाडी, लिंगाळी ता. दौंड जि. पुणे ) हे व अजून दोन जण दि.16 जुलै 2020 रोजी आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहामधुन पळुन गेलेले होते.त्यातील देवगण चव्हाण व गणेश चव्हाण यांना यापूर्वीच अटक केली होती.
आरोपी अक्ष्या उर्फ अक्षय कोंडके चव्हाण हा त्यांचे राहते घरी जात येत असल्याबाबत गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाल्याने दि. 4 मार्च रोजी रात्रीगस्त दरम्यान पोलीस निरीक्षक विनोद घुगे व त्यांच्या स्टाफने आरोपी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यास शिताफीने ताब्यात घेतले आहे. हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक विनोद घुगे, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुकाराम राठोड, पोलिस उपनिरिक्षक शहाजी गोसावी, सुशील लोंढे व पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला होता.