विकासकामे होताना दर्जा तपासणे नागरिकांचे कर्तव्य — जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे
देउळगांवराजे (BS24NEWS)
जिल्हा परिषद , पंचायत समितीच्या माध्यमातून विविध विकास कामे होत असताना त्या कामांचा दर्जा चांगला करुन घेणे हे प्रत्येक सुजान नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी व्यक्त केले .त्या देउळगावराजे (ता. दौंड) येथे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या माध्यमातुन व ग्रामपंचायतीच्या १५वा वित्त आयोगातून मंजूर झालेल्या १कोटी ४१लाख रुपये किमतीच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन , उद्घाटन सोहळा आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
यावेळी बोलताना अध्यक्षा पानसरे म्हणाल्या की , सध्या सुरू असलेली विविध विकास कामे व पुर्ण झालेली विकासकामे पाहून खरच समाधान वाटले .
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात म्हणाले की , शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नी सोमवार दि.7 रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असून वीजपुरवठा पुर्ववत करण्यासाठी प्रयन्त करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे म्हणाले की , सध्या आपल्या जिल्हा परिषद गटात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. अशीच कामे इथून पुढेही केली जातील. सध्या दौंड शुगर कारखाना कार्यक्षेत्रात ऊस जास्त राहिला असे सर्व शेतकरी म्हणत आहेत पण आता गटात तोड़नी प्रोग्राम वाढवनार असून येत्या २५ मार्च पर्यंत ऊस संपवन्याचा प्रयन्त असेल . तसेच आजपर्यंत करखान्याचे ९ लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष आप्पासाहेब पवार, पांडुरंग मेरगळ, पंचायत समिती सभापती हेमलता फडके,उपसभापती विकास कदम, पंचायत समिती सदस्या ताराबाई देवकाते, बादशहा शेख, गुरुमुख नारंग, ,इंद्रजीत जगदाळे, बाळासाहेब बाग़ल, विठ्ठल बाराते,अजय गोरे,सुभाष नागवे बाळासाहेब इंदलकर ,दिपक सोनवणे, सरपंच स्वाती गिरमकर, उपसरपंच नारायण गिरमकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सरपंच अमित गिरमकर यांनी केले तर सूत्रसंचालन दिनेश पवार यांनी केले.