कृषीपुणे जिल्हा ग्रामीण

दौंडमध्ये किसान मोर्चाच्या वतीने शेतीपंप वीज बिल वसुली थांबवून संपूर्ण वीज बिल माफ करण्यासाठी आमरण उपोषण…

तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकजूट होऊन पाठींबा देण्याचे गिरमकर यांचे आवाहन

दौंड (BS24NEWS) शेती पंपाची सक्तीची वीज बिल वसुली थांबवून शेतकर्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करणे व खंडित केलेला वीज पुरवठा ताबडतोब पूर्ववत करावा यासाठी देऊळगावराजे (ता. दौंड) येथे १४ मार्च रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे दौंड तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर यांनी दौंड पोलीसात दिले आहे.

महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी पेटवली चूल…..

लॉकडाउनच्या काळात व त्या आधी राज्यात सतत पडणारा दुष्काळ गारपीट या नैसर्गिक आपत्तीचा आणि कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असताना आगोदरच भुर्दंड सहन करावा लागत असल्याने राज्यातील शेतकर्यांचे कंबरडे मोडलेले आहे. यातच शेतकरी भरडला जात असताना भरमसाठ वीज बिले देऊन आणि शेती वीज पंपाचे सक्तीने वीज बिल वसूल करण्याच्या अनुषंगाने महावितरण कंपनीकडून सक्तीच्या वसुलीसाठी ट्रान्सफार्मर बंद करून सर्व विद्युत पुरवठा खंडित केलेला आहे. अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित करणे हे नैसर्गिक न्याय तत्वाने मान्य होणारे नसून यामुळे ऐन उन्हाळयाच्या तोंडावर कांदा ,उस, भाजीपाला या नगदी पिकांचे नुकसान होत आहे.

हिंगणीबिर्डी ग्रामपंचायतने महावितरणच्या विरोधात घेतला आक्रमक महत्वपूर्ण निर्णय

शेती पंपाची सक्तीची वीज बिल वसुली थांबवून शेतकर्यांचे संपूर्ण वीज बिल माफ करणे व वीज पुरवठा ताबडतोब पूर्ववत करावा या मागणीसाठी देऊळगाव राजे (ता. दौंड) येथे आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले असून त्यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांनी देखील पाठींबा देऊन उपोषण यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!