विकास शेलार “शरदरत्न” पुरस्काराने सन्मानित
केडगाव (BS24NEWS)
देलवडी (ता.दौंड )येथील पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष विकास शेलार यांना शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल शरद रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. एरंडवणे कोथरूड, पुणे येथील शरद अध्यापक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये सेवा निवृत्त प्राध्यापकांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. शेलार यांनी कोरोना काळामध्ये आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली चौफुला (ता. दौंड) येथील कोविंड सेंटरमध्ये समन्वयकाची भूमिका बजावली.या सेंटरमध्ये २५०० पेशंटवर मोफत उपचार करण्यात आले. शिक्षक संघटनेचा पदाधिकारी असताना २००२ ते २००५ दरम्यान नोकरीमध्ये रुजू झालेल्या शिक्षण सेवकांना सेवानिवृत्ती पेन्शन देण्यामध्ये न्यायालयीन लढा उभारला.भीमा पाटस कारखान्याचे ते विद्यमान संचालक आहेत.शेलार यांच्या सोबत दादासाहेब थेटे (वंचित व अनाथांसाठी शाळा) ,परमेश्वर काळे (नक्षलवाद्यांशी लढाई) ,दत्ता दराडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांना शरद रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. या मेळाव्यात शरद अध्यापक विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.