महिला दिनानिमित्त ” ती एक, रूप अनेक” कार्यक्रम उत्साहात…
सागर पवार मित्र परिवाराच्या वतीने आयोजन...
इंदापुर (BS24NEWS)
इंदापूर शहरातील युवा नेते सागर पवार व त्यांच्या मित्र परिवाराच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त ‘ ती एक, रूपं अनेक’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला .
यामध्ये इंदापूर शहरातील विविध क्षेत्रातील आपल्या जिद्द व चिकाटीने यशस्वी झालेल्या युवती व महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशिल असणाऱ्या ॲड. प्रतिमा अभिजीत भरणे आणि सेलिब्रिटी आर्टिस्ट वैशाली उमेश कुऱ्हाडे यांचाही विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी ॲड. प्रतिमा भरणे यांनी महिलांच्या विविध समस्येवर भाष्य करीत त्या समस्या कशा सोडवाव्यात यावरही त्यांनी महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.आयुष्य खूप सुंदर आहे ते अधिक सुंदर बनवा, महिलांनी स्वतःसाठी रोज एक तास द्या, हेल्दी जीवन जगा, छान जीवन जगा व प्रसन्न जगा असाही संदेश यावेळी प्रतिभा भरणे यांनी दिला.
या कार्यक्रमाप्रसंगी, शोभा भरणे, तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर, स्मिता पवार, अर्चना शेवाळे, माजी नगराध्यक्षा अलका ताटे, माया विंचू, सुवर्णा गाढवे, सविता पवार यासह असंख्य महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमा इंगोले व सारिका जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले.
पर्यवेक्षक म्हणून डॉ. अश्विनी ठोंबरे व डॉ. अनुराधा धापटे यांनी काम पाहिलं, सुत्र संचालन दिपा राऊत यांनी केलं तर आभार सागर पवार यांनी मानले.
या स्पर्धेमध्ये वेशभुषा स्पर्धा, सासु सुन जोडी, सुपर मायलेक यांसह विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे —
वेशभुषा —
प्रथम .सुमेधा दोशी
द्वितीय: आकांक्षा शहा
सासु- सुन जोडी—
प्रथम : घनवट
द्वितीय: अनुराधा धापटे
सुपर मायलेक जोडी—
प्रथम: गीता कोथमिरे.
द्वितीय : सारिका जगताप