सोसायटी निवडणूक : आखा गाव पुढारी नडला, तरी तात्या नाही पडला..!
दौंड (BS24NEWS) – सध्या दौंड तालुक्यात विविध कार्यकारी सोसायट्यांचे वारे वहात असून यात तालुक्यात सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक ठरली ती पारगाव विविध कार्यकारी सोसायटीची पारगाव ही तालुक्याची राजकीय राजधानी म्हणून ओळखली जाते याच सोसायटी निवडणुकीत तालुका स्तरावरील जवळपास डझन भर नेत्यांनी आपले नशीब आजमावले कोण पडलं तर कोण निवडून आले
परंतु या सोसायटी निवडणुकीत अपक्ष म्हणून पारगाव माजी उपसरपंच संभाजी उर्फ तात्या ताकवणे उभा राहिला सोसायटी निवडणुकीत अपक्ष आणि एकटा उमेदवार उभा राहणं म्हणजे फक्त विरोधाला विरोध करण एवढंच असतंय अपक्ष उमेदवार सोसायटीत ते पण पारगाव च्या निवडून येणे शक्य च नाही परंतु अपक्ष उभा राहून निवडून येण्याची किमया साध्य केली आहे ते संभाजी ताकवणे यांनी सोसायटीची निवडणूक म्हणजे गाव पुढारी गावातील मोठा वाडा आणि सोसायटीतील वर्षनुवर्ष सत्ता भोगलेले पुढारी यांचीच असते या सर्व गोष्टींना फाटा देत संभाजी ताकवणे यांनी ही निवडणूक मारत पारगाव च नव्हे तर तालुक्यात एक नवा पायंडा पाडला आहे सतत जनसंपर्क मित भाषी बोलणं आणि निवडणुकीच्या वेळी डावपेच करणे यात संभाजी ताकवणे यशस्वी झाले आहेत रविवारी सायंकाळी सोसायटीचा निकाल लागल्यानंतर तालुक्यात एकच चर्चा होती आक्खा गाव पुढारी नडला पण संभा तात्या नाही पडला …