रावणगांव सोसायटीच्या निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा – पांडुरंग मेरगळ
दौंड (BS24NEWS)
रावणगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुक निर्णय अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंग मेरगळ यांनी जिल्हा सहकारी निवडणूक तथा जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे लेखी केली आहे.
रावणगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुक कार्यक्रम सुरू आहे. दि.28मार्च रोजी अर्जांची छाननी सुरू होती. यावेळी नामनिर्देशन पत्र विक्री रजिस्टर मध्ये मुदत संपल्यानंतर खाडाखोड करण्यात आलेली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या पावत्यांची मागणी करूनही पावती पुस्तक चोरीला गेले आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी सांगत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीनंतर अधिकृत यादी घेतल्यानंतर त्या यादीत नसलेल्या नोंदी ही नंतर केल्याचे दिसुन येत असल्याने तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी हराळ यांची चौकशी करून गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून निलंबित करावे तसेच रावणगांव विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुकितील उमेदवारांची छाननी प्रक्रिया पुन्हा घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.