राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या घरावर हल्ल्या प्रकरणी दौंडमध्ये निषेध
दौंड (BS24NEWS)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या राहत्या घरावर समाजातील काही विद्रोही, विघातक शक्तींनी जो भ्याड हल्ला झाला होता त्याचा दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहारात निषेध करण्यात आला.
यावेळी हल्ल्याच्या मुख्य सुत्रधारास लवकरात लवकर अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी उपस्थितांनी करत निवेदन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या सरचिटणीस वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य विरधवल जगदाळे, युवकचे अध्यक्ष विकास खळदकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा योगिनी दिवेकर, सचिन गायकवाड, नितिन दोरगे, इंद्रजित जगदाळे, प्रशांत धनवे, निखिल स्वामी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.