रिपब्लिकन सेनेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा भीम गौरव पुरस्काराने सन्मान
दौंड (BS24NEWS) विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्ताने दौंड रिपब्लिकन सेना, आनंदराज आंबेडकर तसेच ऍश इ वेस्ट मॅनेजमेंट यांच्या विद्यमाने सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, उद्योजक, कला व क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना भीम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासो पवार, माजी जिल्हा सदस्य वीरधवल जगदाळे, रवींद्र कांबळे, कांचन साळवे, बंडू तात्या जगताप या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार्थींना भीम गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील पदाधिकारी, नगरसेवक, भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहाय्यक अभियंतापदी गणेश गिरमकर यांची निवड
भीम गौरव पुरस्काराचे पुरस्कार्थी पुढीलप्रमाणे – रमेश राठोड (कोविड योद्धा), डेनिस जोसेफ (शैक्षणिक क्रीडा), नरेंद्र जगताप (पत्रकारिता), सत्यप्रकाश मासाळकर (अभियंता), डॉ. राहुल जगदाळे (वैद्यकीय), सुरेश निंबाळकर (उद्योजक), दीपक शहाणे (बांधकाम व्यवसायिक), चंद्रकांत लोंढे (कला व नाट्य), क्लीन सायन्स अँड टेक लि. (सामाजिक) या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी अनिल साळवे,राहुल भालेराव, आनंद बगाडे, सचिन साळवे, मोहन सोनवणे, राजू गायकवाड, जालिंदर सोनवणे,दिलीप पगारे, अमित शिंदे आदींनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी पवार व अनिल धेंडे यांनी केले.