पुणे जिल्हा ग्रामीणराजकीयराज्य

राज्यातील अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया तात्काळ राबवा – आमदार राहुल कुल

दौंड (BS24NEWS)

अनुकंपावरील नियुक्ती भरती प्रक्रिया त्वरित सुरु करण्यात यावी अशी मागणी दौंडचे आमदार राहुल कूल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात मागील २ वर्षे राज्यातील पदभरतीस बंदी घालण्यात आली होती. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या खासगी, अल्पसंख्याक, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थातील सर्व प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक विद्यालयातील सर्व पदांना हा नियम लागू करण्यात आला होता तसेच अनुकंपा तत्वावरील भरती देखील बंद करण्यात आली होती.

कोरोना कालावधी मध्ये कर्त्यव्य बजावताना अनेक शासकीय अधिकारी व कर्मचारी बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची ही नियुक्ती झालेली नाही. दि.२६ऑगस्ट२०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील अनुकंपा तत्वावरील नियुक्तीच्या प्रतिक्षेत असणाऱ्या उमेदवारांसाठी कार्यपद्धती निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याची राज्य सरकारने अंमलबजावणी करत कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचेकडे लेखी पत्राद्वारे आमदार कुल यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!