नानविज(तव) विद्यालयात वीस वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा!
दौंड (BS24NEWS)
दौंड तालुक्यातील नानविज(तव) नामदेवराव पासलकर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तब्बल वीस वर्षांनंतर सन २००१- २००२ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता .
यावेळी या बॅचमध्ये असणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांपैकी २६ विद्यार्थी या स्नेहमेळाव्यात सहभागी झाले होते .
सन २००१- २००२ च्या दहावीच्या बॅचचे मुख्याध्यापक वाघमोडे , शिक्षक टेकवडे, शेळके, कुलाळ, झगडे,डोंबाळे ,लवंगे तसेच शिक्षिका शितोळे, शेळके, खोत आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली . त्यानंतर विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्वागत , दीपप्रज्वलन , परिचय व भाषण , शिक्षक स्वागत , स्नेहभोजन अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती .
यावेळी शाळेसाठी चार सीसीटिव्ही कॅमेरे भेट म्हणून देण्यात आले.
या उपक्रमांची माहिती शरद बामगुडे यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दिली . तसेच , यापुढेही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी केला . वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सांगता केली . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप नागवडे यांनी केले . या मेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थी प्रदीप नागवडे, शरद बामगुडे, किरण शेलार,शरद पाटील, सागर वाबळे,संतोष पासलकर,चेतन पासलकर, अतुल पासलकर, अमोल भोसले,राहुल घाडगे,वनिता राऊत, पिंटी केदारी, वैशाली पासलकर, सारिका पासलकर, ज्योती पाटोळे, शैनाज शेख,शीतल पायगुडे भोसले , यांनी नियोजन केले .