दौंड शुगर कारखान्याच्या वर्कशॉप मधून चोरी , घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद
दौंड(BS24NEWS)
दौंड शुगर कारखान्याच्या वर्कशॉप मधून चोरी झाली असल्याची घटना घडली आहे .
याबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याच्या वर्कशॉप मधून दि.२३ एप्रिल रोजी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी सुनील अजय चौहान (सध्या रा. लेबर कॉलनी आलेगाव , दौंड शुगर कारखाना दौंड मूळ रा. बिहार) याने कारखान्याच्या वर्कशॉपमधुन वेल्डिंग केबल, गन मेटल बार, गन मेटल रिंग असा ९५०० रुपयांचा माल चोरून नेला असल्याचे सीसीटीव्ही सीसीटीव्ही फुटेज वरून दिसून आल्याने तसेच आरोपी सुनील चौहान याच्याकडे चौकशी केली असता त्यानेही माल चोरी केल्याची कबुली दिली असल्याने त्याविरोधात दौंड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी सिक्युरिटी गार्ड उद्धव काशिनाथ कापसे यांनी दौंड पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार लोहार करीत आहेत.