दौंड शहारात शौचालय बांधा , काँग्रेसची मागणी
दौंड (BS24NEWS)
दौंड शहरांमध्ये पुरुष व महिला शौचालय लवकरात लवकर बांधण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने
दौंड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांना निवेदन देवुन करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, दौंड शहरांमध्ये पुरुष व महिला शौचालय नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे व जे शौचालय होते ते पाडल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे लवकरात लवकर शौचालय बांधण्यात यावे .
शहरात कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी फिरत असते त्यांचे जुने झालेले मशिन व स्पिकर बदलुन नवीन बसवावेत अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी दौंड शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महेश जगदाळे , काँग्रेसचे तालुका महासचिव प्रकाश सोनवणे , निलेश बगाडे , सामाजिक कार्यकर्ते विनायक गवळी इतर काॅंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.