पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय
दौंड विकास सेवा संस्थेच्या स्वीकृत सदस्यपदी राजू जगदाळे, हनुमंत मेरगळ यांची निवड
दौंड (BS24NEWS)
दौंड येथील दौंड विकास सेवा संस्थेच्या स्वीकृत सदस्यपदी राजू जगदाळे व हनुमंत मेरगळ यांची आज (दि.12) रोजी संस्थेच्या मासिक सभेत स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. याप्रसंगी माजी जि. प. सदस्य वीरधवल जगदाळे , माजी नगरसेवक इंद्रजीत जगदाळे, संस्थेचे अध्यक्ष सुहास जगदाळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. याप्रसंगी स्वीकृत सदस्य राजू जगदाळे व हनुमंत मेरगळ यांचा सत्कार करण्यात आला. राजू जगदाळे हे साप्ताहिक पुष्कराज चे संपादक म्हणून कार्यरत आहेत तर हनुमंत मेरगळ हे प्रगतशील बागायतदार म्हणून ओळखले जातात.