राजकीय
केतकी चितळेवर गुन्हा दाखल करा – वैशाली नागवडे
दौंड (BS24NEWS)
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुणे च्या वतीने केतकी चितळे यांनी केलेल्या फेसबुक पोस्ट व त्या संबंधित असणार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घोलप साहेब यांच्याकडे पुणे विभाग अध्यक्ष वैशाली नागवडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान ,अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. यावर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी व कार्यकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत.