पुणे जिल्हा ग्रामीण
स्वातंत्र्यसैनिक कै. किसनदास कटारिया जन्मशताब्दी स्मरणिकेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन
दौंड (BS24NEWS)
स्वातंत्र्यसैनिक कै. किसनदास कटारिया ऊर्फ बाबुशेठ बोरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनपटावर विविध लेखकांनी घेतलेला मागोवा, या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार,
राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार ॲड.राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते नंदू पवार,
दौंड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी अध्यक्ष ॲड.अजित बलदोटा , दौंड मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष राजेश पाटील, रोहित पाटिल आदी यावेळी उपस्थित होते.