आरोग्य विभागाची बनावट नियुक्तीपत्रे प्रकरणी दौंड व यवत पोलिसांत गुन्हा दाखल
दौंड (BS24NEWS)
पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या नावाची बनावट नियुक्ती पत्रे घेत नोकरीवर रुजू होण्यासाठी आलेल्या दोघावर यवत पोलिस ठाण्यात तर एकावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी बारामती व इंदापूर तालुक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांवर उमेदवार बनावट नियुक्ती पत्रे घेवून पोहोचले होते त्याच पद्धतीने हे उमेदवार राहु व देऊळगावराजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बनावट नियुक्तपत्र घेऊन हजर झाले होते.
याबाबत राहू प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. मोहन कृष्णाजी पांढरे ( वय ४२ वर्षे)यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पांढरे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की शुक्रवारी (दि.20)रोजी डॉ. रूपाली संपते, लिपीक ओमप्रकाश पेठकर असे आम्ही राहु (ता. दौंड )येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डयुटीस हजर असताना राजकुमार लक्ष्मण शेटे (रा. १२६२ रोड, नं.८ स्वामी समर्थ कॉलनी शरदनगर चिखली पुणे) व विक्रम बाळु बंडगर( रा. कुंभारगांव, ता. इंदापुर, जि.पुणे) असे दोघे आमचेकडे आले व त्यांनी मला आमची येथे अधिपरिचारीका या पदावर नेमणुक झाली आहे असे सांगुन हजर होत असले बाबतचा रूजु रिपोर्ट व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा आदेश दिला. त्यावेळी मी सदर आदेशाचे अवलोकन केले सदर आदेशाची पाहणी करीत असताना त्यावर आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा शिक्का मारलेला व त्यावर त्यांची सही असल्याचे निर्दशनास आले त्यावरून जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. भगवान पवार यांना फोनदवारे तसेच लेखी पत्रादवारे कळविण्यात आले असता त्यांनी आम्हाला सांगितले की, आम्ही कोणीसही प्राथमिक आरोग्य केंद्र राहु येथे अधिपरिचारीका (स्टापनर्स) यांना हजर होणेसाठी पाठविले नाही तसे कोण आलले असेल तर आपण संबधीतावर कारवाई करा या कारणास्तव फिर्याद दिली असल्याचे पांढरे यांनी स्पष्ट केले.
तसेच याबाबात देऊळगावराजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी अविनाश रामलु आलमवार (वय – 26) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आलमवार यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की , शुक्रवारी (दि.20)रोजी आरोपी सुरज दत्तात्रय खारतोडे ( वय 26 वर्षे रा. कळस ता इंदापुर जि. पुणे ) याने त्याचे अधिपरिचारिक पुरुष या पदावर नियमीत नियुक्ती झाल्याचे महाराष्ट्र शासनाचे व आरोग्य खात्याचे चिन्ह वापरून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे यांचा बनावट शिक्का व सहीची बनावट नियुक्तीची ऑर्डर आणुन त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगावराजे येथे अधिपरिचारिक या पदावर नियुक्त होवुन शासनाची फसवणुक केलेली असल्याने त्याविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.