पुणे जिल्हा ग्रामीण
वी आर स्कॅवेंजरस ग्रुप व वनविभागाच्यावतीने वृक्षारोपण
दौंड(BS24NEWS)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दौंड येथील वी आर स्कॅवेंजरस स्वयंसेवक ग्रुप व महाराष्ट्र वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात आला.
या वृक्षारोपणासाठी ‘वी आर स्कॅवेंजरस्’ च्या स्वयंसेवकांनी मागिल एक आठवड्यापासून येथिल गुप्तेश्वर वनक्षेत्रात स्वतः श्रमदान करून १७५ खड्डे तयार केले होते . यामध्ये आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत १५० रोपं लावली.
यावेळी ‘वी आर स्कॅवेंजरस्’ ग्रुपचे स्वयंसेवक, वनपाल मगर , सावंत, गायकवाड , वन कर्मचारी दळवी, देशमाने, कांबळे, झिटे आदी कर्मचारी उपस्थित होते. तसेच दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गोसावी,अबनावे, पोलिस कॉन्स्टेबल देवकाते व हवलदार गावडे यांनीही या वृक्षारोपणा कार्यक्रमात सहभाग घेतला.