पुणे सोलापूर महामार्गावरील प्रसिध्द “हॉटेल कांचन” च्या मालकांना गंडा घालणाराना अटक
यवत पोलिसांची कारवाई, दोन आरोपींना अटक
यवत(BS24NEWS) यवत मधील प्रसिद्ध हॉटेल कांचन च्या मालकाला ४,४२,५०० रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया फुड इन्स्पेक्टरला यवत पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार दि.०३/०५/२०२२ रोजी पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल कांचन व्हेज मध्ये जाऊन हॉटेल मालकास आम्ही मुंबई मंत्रालयातील फुड इन्स्पेक्टर असल्याचे भासवुन तुमच्या हाॅटेलची तक्रार माझेकडे आलेली आहे. तुमच्या हाॅटेलमुळे एका महीलेला फुड पाॅयजन झाले आहे म्हणुन तिने माझेकडे तक्रार दिलेली आहे. त्यामुळे आमची टिम तुमचे हाॅटेल सिल करण्यासाठी तुमच्याकडे येत आहे. तुमच्यावर कारवाई करायची नसेल तर तुंम्ही मी सांगतो त्या खात्यावर पैसे जमा करा असे सांगुन हॉटेल मालक प्रसाद कांचन यांच्या कडुन ४,४२,५००/- रूपये ऑनलाईन घेवुन फसवणुक केल्याचा गुन्हा यवत पोलिसात दाखल करण्यात आला होता त्या गुन्हा चा यवत पोलीस तपास करत असताना
यातील आरोपी सुरज सुरेश काळे वय ४० वर्षे रा मधूबन नगर सोलापूर, व धर्मराज शिवाप्पा शिकलवाडी वय ३६ वर्षे रा रामवाडी धोंडिबा वस्ती, हे सोलापूर मध्ये हे एका ऑनलाइन मनी ट्रान्सफर शॉप वर यातील पाठवलेले पैसे नेण्याकरिता आले असता त्यांना यवत पोलीस च्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. ही कामगिरी
पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोसई संजय नागरगोजे, पो. ना. राम जगताप, प्रवीण चौधर, मारुती बाराते, यांच्या पथकाने केली आहे.