पुणे जिल्हा ग्रामीण

पाटस – कानगाव रस्त्यावर जलवाहिनीसाठी खोदकाम केलेली माती टाकण्यात आल्याने अपघाताची शक्यता

पाटस(BS24NEWS)

दौंड तालुक्यातील पाटस येथील पाटस – कानगाव रस्त्याच्या कडेने पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे . खोदकाम केलेली माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे . सदर माती आणि मुरुमामुळे वाहनचालकांचा अपघात होण्याची शक्यता आहे . सदर माती रस्त्यावरून तातडीने हटवण्यात यावी अशी मागणी वाहनचालक करीत आहेत .

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत दौंड तालुक्यातील गार, सोनवडी, नानवीज या गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना २०१९-२० मध्ये १३ कोटी ९० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे . पाटस गावच्या हद्दीत पाटस – कानगाव रस्त्याच्या कडेने सदर जलवाहिनी टाकण्याचे काम सूरु आहे . जलवाहिनी चे पाईप टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे .

 

हे खोदकाम करताना माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर आली आहे . मात्र गेले काही दिवसांपासून माती तशीच रस्त्यावर पडून आहे .पाऊस पडत असल्याने ही माती रस्त्यावर पसरत आहे .दुचाकी घसरून दुचाकी स्वारांचा अपघात होण्याची शक्यता आहे .पाटस – कानगाव रस्त्यावर खासगी कपन्यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे .अशा परिस्थितीत रस्त्यावर पडलेल्या या मातीमुळे वाहनचालकाना कसरत करावी लागत आहे .

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे यांच्याशी संपर्क साधला असता ,उद्या सदर ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!