सोशल मीडियावर आमदार कुल, प्रदिप कंद यांच्या फोटोची हवा
यवत (BS24NEWS) जगद्गुरु, संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज तीर्थ क्षेत्र देहू नगरीमध्ये आगमन झाले असता त्यांच्या स्वागतासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे यांचे समवेत दौंड तालुक्याचे आमदार ॲड. राहुल कुल व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद हे देखील उपस्थित होते.
याबाबतची पोस्ट आमदार राहुल कुल व प्रदीप कंद यांनी सोशल मीडियावर शेअर करताच त्यांचे हे फोटो कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केले.प्रदीप कंद यांनी स्वतः पोस्ट करत “ग्रेट भेट अविस्मरणीय क्षण” असे लिहिलं तर आमदार राहुल कुल यांच्या कार्यकर्त्यांनी “दौंडचा स्वाभिमान”, “स्वाभिमानी आमदार” आशा प्रकारे कॅप्शन देत कार्यकर्त्यांनी हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तसेच आमदार कुल यांच्या पोस्ट वर ही प्रतिक्रिया देताना दौंडचा अभिमान, स्वाभिमान, तालुक्यासाठी अभिमानाची बाब या प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच्या कुल व कंद यांच्या फोटोची सोशल मीडियावर हवा झाली याची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.