दौंडमधे ऑनलाइन जुगारावर पोलिसांचा छापा, सहा जणांना अटक
दौंड (BS24NEWS)
दौंड शहरातील शालिमार चौक येथे ऑनलाइन जुगारावर छापा टाकत पोलिसांनी सहा जणांना अटक केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
दौंड शहरातील शालिमार चौक येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये अब्रहाम थॉमसन धोरखंडे हा आपल्या ओळखीच्या लोकांना मोबाईल मधील गोलाकार आकड्याच्या बदल्यात त्यांना पैसे देऊन बेकायदा जुगार खेळत आहे व खेळवीत आहे अशी खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांना मिळाल्याने त्यांनी लागलीच आपली टीम पाठवून सदर ठिकाणी छापा टाकला.या छाप्यामध्ये एकूण 6890 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी कुणाल गोपी खराटे (रा.शालिमार चौक ,दौंड), पप्पू सुरेश तुपे (रा. शिर्सुफळ,ता. बारामती ,जि. पुणे) ,ओमकार अंकुश गायकवाड (रा. शालिमार चौक , दौंड), तेजस बाबासो कांबळे (रा. सरपंच वस्ती गोपाळवाडी ता. दौंड जि .पुणे) ,रोहित युवराज सोनवणे (रा.कुरकुंभ मोरी ,दौंड),अब्राहम थॉमस धोरखंडे( रा.शालिमार चौक, दौंड) यांना अटक करण्यात आली आहे.