राहु व पिंपळगावला मुलांचे शाळेत वाजत गाजत स्वागत …
राहु(BS24NEWS)
नवा गणवेश… नवे दप्तर… नव्या कोऱ्या वह्यांचा सुगंध… अशा जय्यत तयारीसह सुट्टीनंतर पुन्हा एकदा शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला आहे. शाळांची पहिली घंटा वाजली असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.दौंड तालुक्यातील राहू व पिंपळगावला विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
पिंपळगाव येथे मुख्य चौकात साऊंड लावून मुलांनी शाळेपर्यंत प्रभात फेरी काढली. शाळेत मुलांना गुलाब पुष्प,फुगे,गोड खाऊ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी सरपंच मंगल थोरात, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र कसुरे,उपाध्यक्ष सचिन शितोळे, केंद्रप्रमुख सरिता शिंदे, मुख्याध्यापक बाळासाहेब थोरात,संतोष विश्वासे, सोमनाथ थोरात, तन्मय विश्वासे, अजय थोरात, नितीन सुतार, अमोल थोरात,आदी सह शिक्षक व पालक उपस्थित होते.
राहू येथील कैलास विद्या मंदिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पारंपरिक वाद्याच्या गजरात मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांना खाऊ व गुलाबपुष्प दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल,गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी बांधकाम विभागाचे उपअभियंता माळशिकारे,संस्थेचे उपाअध्यक्ष शिवाजी सोनवणे, सचिव परशराम शिंदे,संचालक चिमाजी कुल,अरुण नवले, सरपंच दिलीप देशमुख,उपसरपंच गणेश शिंदे आदी उपस्थित होते.