महावितरणच्या केडगाव विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता यांना भेटण्यासाठी मोबाईल ठेवावा लागतो बाहेर
राहू (BS24NEWS) महावितरणच्या केडगाव विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांना भेटण्यासाठी जात असाल तर सावधान तुमचा मोबाईल बाहेर काढून ठेवा नाही तर तुम्हास भेटू दिले जाणार नाही असा अजब प्रकार शेतकरी अथवा इतर नागरिक भेटण्यासाठी गेले असताना दिसून येत आहे.
या अजब फतव्यामुळे शेतकरी व नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे मर्जीतील ठेकेदार यांना असा कोणत्याही प्रकारचा नियम व बंधन असल्याचे पाहावयास मिळत आहे. सरकारी अथवा खासगी कार्यालयांमध्ये तुमचा मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा किंवा मोबाईल वापरू नका अशा आशयाच्या सूचना असतात. केडगाव येथील महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांची कार्यालयामध्ये भेट घ्यावयाची असल्यास नागरिकांना चिठ्ठी अगोदर द्यावे लागते त्यानंतर कार्यालयात बाहेरच तेथील कारकून कामानिमित्त भेटण्यासाठी आलेल्या शेतकरी अथवा इतर अभ्यांगताना तुमचा मोबाईल बाहेर काढून ठेवा नंतरच आज कार्यालयामध्ये अशा आशयाच्या सूचना देत आत जाण्यासाठी सांगत असतात. अनेक जण या सूचनांचे पालन करत असले तरी मुळातच कार्यकारी अभियंता यांना सर्व सामान्य शेतकरी वर्गाच्या मोबाईलची एवढी भीती वाटतेतेच कशाला ? अशा प्रकारचा सवालही शेतकरी व इतर नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
याबाबत रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की शेतकऱ्यांना मोबाईल कार्यालय बाहेर काढून ठेवायला लावणे की चूक असून हा नागरिकांच्या स्वातंत्र्यावरच घाला आहे. महावितरणचा ठेकेदारांना वेगळा नियम व सर्वसामान्य वेगळा नियम लावणे ही घोडचूक आहे.
याबाबत महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र एडके यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही