मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी दौंड पोलीसांकडुन जेरंबद
दौंड (BS24NEWS)
मोबाईल चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी दौंड पोलीसांकडुन जेरंबद करण्यात आली असल्याची माहिती दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. २४ जून रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास दौंड पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार महेद्र गायकवाड यांना दौंड शहरातील अमर सोसायटी येथुन मोबाईल चोरून नेलेबाबत माहीती मिळताच त्याबाबत ठाणे अंमलदार यांनी पोलिस निरिक्षक विनोद घुगे यांना सांगुन त्यांचे सुचनेनुसार गुन्हे अन्वेषण पथकाने त्या ठिकाणी जावुन त्या ठिकाणी ६ जणांना ताब्यात घेत दौंड पोलीस ठाण्यात आणले .
सुनिल गणपत जाचक ( रा. गणेश सोसायटी, सरपंचवस्ती, दौंड) यांचे राहते घरी चाकुना धाक दाखवुन जबरी चोरी करून दरोडा टाकताना सोमरा नगर मोदी (वय २६ वर्षे, रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम राज्य झारखंड), आकाश दिलीप मोदी (वय २५ वर्षे रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम राज्य झारखंड) , चंदन नगर मोदी (वय २२ वर्षे रा. आमदा, जि. सरेकला पश्चिम, राज्य झारखंड ) यांच्यासह अजुन तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती देताना दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस म्हणाले की, ही मोबाईल चोरी करणारी टोळी दरवर्षी वारीच्या काळात मोबाईल चोरी करत असल्याची त्यांची पद्धत आहे. यामध्ये एकूण सहा आरोपी असुन त्यातील तीन जणांची वयाची ओळख पटवायची आहे. हे आरोपी दौंड रेल्वे स्थानकालगत राहत आहेत. यांच्याकडून राहत असलेल्या ठिकाणाहून १०१ मोबाईल आढळुन आले असुन साधारण १४ लाख रुपयांचा मुददेमाल मिळवण्यात आले असल्याचे ही त्यांनी सांगितले.
हि कामगिरी ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक विनोद घुगे,सहाय्यक पोलीस निरिक्षक तुकाराम राठोड,पोलीस उपनिरिक्षक सतिश राउत पो. कॉ.अमोल देवकाते,विशाल जावळे ,अमीर शेख ,अमोल गवळी ,सुभाष राऊत ,महेंद्र गायकवाड,पांडुरंग थोरात , डि.जी. भाकरे, शरद वारे, आदेश राउत यांनी भाग घेतला.