आषाढी वारी विशेष – वारीच्या वाटेवर लावणीच्या बारीचे सादरीकरण
कलाकेंद्र चालक अशोक जाधव व जयश्री जाधव दाम्पत्याने जपली ३२ वर्षांची परंपरा
यवत (BS24NEWS) जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी मंडळी शनिवारी यवतचा मुक्काम आटोपून रविवारी वरवंड मुक्कामी जात असताना पालखी मार्गवर असणाऱ्या वाकडा पूल येथील न्यू अंबिका कला केंद्रातील महिला लावणी कलावंतांनी वारकऱ्यांची जेवणाची व लावणी बारी पाहण्याची सोय केली होती.
वखारी, ता. दौंड येथील न्यू अंबिका कला केंद्रातील लावणी कलावंत ह्या गेली ३२ वर्ष तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी मंडळींचा थकवा घालविण्यासाठी लावणी आणि अभांग सादर करतात तसेच यावेळी सुमारे आठ हजाराहुन अधिक वारकर्यांना भोजनाची सोय देखील या कला केंद्राच्या वतीने केले जाते
सकाळी आठ वाजल्या पासूनच या ठिकाणी जेवणाची सोय केली जाते तर जेवणानंतर वारकरी मंडळींचा थकवा दूर व्हावा व मनोरंजन व्हावे या हेतूने कला केंद्राचे संचालक अशोक जाधव व जयश्री जाधव हे कला केंद्राच्या बाहेर मोठे व्यासपीठ उभा करून 3 तास लावणी व अभांग यांची जुगलबंदी सादर करतात हा कार्यक्रम पाहण्यासाठी अक्षरशः वारकरी मंडळींची झुबंड उडते
कोरोना मुळे दोन वर्षे रद्द झालेला पालखी सोहळा या वर्षी मोठ्या उत्साहात पार पडत असून आम्हाला देखील तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभते याबद्दल आम्ही विठुरायाचे ऋणी आहोत अशी भावना यावेळी कला केंद्राचे संचालक अशोक जाधव यांनी बोलून दाखविली