पुणे जिल्हा ग्रामीणविशेष बातमीशैक्षणिक

महा- ई – सेवा केंद्राची सेवा ठप्प , विद्यार्थी व पालक हतबल

दौंड(BS24NEWS)

महाऑनलाईन या संकेतस्थळचा सर्व्हर दिवसभर पूर्ण पणे बंद पडल्याने विद्यार्थ्यांसह पालक वर्ग चिंतेत पडले आहेत.

सध्या 10 वी व 12 वीच्या परीक्षांचे  निकाल लागले आहेत.या परीक्षांमधील उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणारी महत्वपूर्ण कागदपत्रे जसे जातीचे दाखले,उत्पन्न दाखले,नॉन क्रिमीलयर, EWS, वय अधिवास प्रमाणपत्र,अल्पभूधारक असे दाखले लागत असतात. महसूल विभागामार्फत हे दाखले दिले जातात. यासाठी सरकारने महाऑनलाईन केंद्रे सुरु केली असून त्याठिकाणी जावून विद्यार्थ्यानी आपल्याला हव्या असणाऱ्या दाखल्यासाठी चा अर्ज दाखल करावा लागतो त्यावर ऑनलाईन पद्धतीने तपासणी करून दाखला दिला जात असतो. मागील 2 दिवसांपासून हया महाऑनलाईन संकेतस्थळचा सर्व्हर बंद पडला आहे. त्यामुळे विदयार्थी व पालक यांची धावपळ होताना पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवसापासून महाऑनलाईन हे संकेतस्थळ पूर्णपणे बंद आहे . विद्यार्थीच्या डिप्लोमा  प्रवेशाची प्रकिया मुदत ही 30 जून आहे .त्यामुळे पालक व विदयार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.जर मुदतीत दाखले मिळाले नाही तर शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने पालक व विदयार्थी चिंतेत पडले आहेत.

दौंड तालुक्यातील आपले सरकार चालक हे 2 दिवसांपासून खूप सर्व्हर सुरू होण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र सर्व्हर बंद मुळे ते ही हतबल झाले आहे. काही ठिकाणी पालक  विद्यार्थी व आपले सरकार चालक यांच्यात संघर्ष होताना पाहायला मिळत आहे.

महाऑनलाईनच्या हेल्पलाइनवर संपर्क केला असता सर्व्हरचे काम चालू आहे .लवकरच पूर्ववत होईल असे सांगण्यात आले. प्रशासनाने लवकरात लवकर याकडे लक्ष्य देऊन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा अशी मागणी पुढे येत आहे.

याबाबत दौंडचे तहसिलदार संजय पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला आहे. सर्व्हर चे काम सुरु असुन ते लवकरच संपेल व सर्व्हर सुरळीत सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!