क्राईमपुणे जिल्हा ग्रामीण

अल्पवयीन मुलीच्या गळ्यावर कटरने वार , ग्रामस्थांच्या मदतीने आरोपी ताब्यात

कुरकुंभ (BS24NEWS)

कुरकुंभ (ता.दौंड) येथे पुणे- सोलापुर महामार्गालगत मळद तलावाच्या समोरील शेतात आज दि.५ जुलै साडेअकराच्या सुमारास अल्पवयीन मुलीवर कटरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी राहुल श्रीशैल निरजे (वय २७, रा.खटाव,जि. सांगली,सध्या रा.पुणे) याला स्थानीक नागरिकांच्या सतर्कतेने ताब्यात घेण्यात आले असून गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या युवतीला दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आरोपी युवक राहुल निरजे हा पिरंगुट येथील कुकरच्या हँडल बनवणाऱ्या खाजगी कंपनीत काम करीत होता.युवती ही त्याची नातेवाईक असून त्यांच्या मध्ये प्रेम संबंध असल्याची माहीती युवकाने दिली आहे.सकाळी युवतीला दुचाकी क्रमांक (एम एच १० डी २७१०) वरून हडपसर येथील गाडीतळावरून घेऊन सोलापूरच्या दिशेने जात असताना कुरकुंभच्या चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मळद तलावाच्या समोरील निर्जन उसाच्या शेतात घेऊन जाताना काही ग्रामस्थांनी पाहीले.त्यानंतर काही वेळात आरोपीला पळताना पाहून ग्रामस्थांनी तत्परता दाखवत आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले तर रुग्णवाहिकेच्या मदतीने युवतीला तात्काळ दौंड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हि घटना ही प्रेम संबंधातून झाली असल्याची प्राथमीक माहीती मिळत असुन आरोपी युवकाने दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या घरच्यांनी आपल्याला मागील दोन वर्षांपासून लग्नासाठी ताटकळत ठेऊन आता काहीच प्रतीसाद मिळत नसल्याच्या कारणास्तव हे पाऊल उचलले असल्याचे सांगीतले आहे.

दरम्यान या घटनेची माहीती मिळताच कुरकुंभचे सरपंच आयुब शेख,माजी उपसरपंच सुनील पवार,पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे,अभिजीत शितोळे व स्थानीक नागरीकांनी घटनास्थळी जाऊन तत्परतेने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमी युवतीस रुग्णालयात दाखल केले.याबाबत पुढील तपास पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Need Help?
error: Content is protected !!