विद्युत रोहित्रांची चोरी करणारी टोळी जेरबंद, यवत पोलिसांची कामगीरी…
यवत(BS24NEWS)
यवत परिसरातील विद्युत रोहित्रांची चोऱ्या करणारी टोळी यवत पोलिसांनी जेरबंद केल्याची माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे .
याबाबत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी दि. 8 रोजी
बोरिभडक (ता. दौंड) येथील विद्युत रोहित्र चोरी च्या गुन्ह्या चा तपास करत असताना यातील संशयित आरोपी
राहू मध्ये येणार असल्याची माहिती मिळताच यवत पोलीस पथक सापळा लावून थांबले होते. त्याचवेळी एक संशयित कार मधील चार इसम राहू येथील लक्ष्मीआई मंदिराजवळ आले असता यवत गुन्हे शोध पथकाने त्यांना मारुती ८०० कारसह ताब्यात घेऊन विचारपूस केली यातील संशयित इसमांनी त्यांचे इतर साथीदारांचे मदतीने राहु, कानगाव, पाटस, कासुर्डी, बोरीभडक, खुटबाव, उंडवडी, कोरेगाव भिवर असे यवत पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण २८ रोहित्र (डीपी) चोरीचे गुन्हे केलेचे सांगितले असून आरोपी दत्ता अशोक शिंदे वय २८ वर्षे, रा.राहु, थोरले विहीर, ता.दौंड जि.पुणे , राज मच्छिंद्र वानखडे वय १९ वर्षे, रा.केडगाव, म्हसोबाचा मळा, ता.दौंड, जि.पुणे. मुळ रा.बिडगाव, ता.मुर्तुजापुर, जि.अकोला , विशाल मनोहर सोनवणे वय ३० वर्षे रा.सासवड, ता.पुरंदर, जि.पुणे ,महादेव उर्फ सोन्या कमलाकर पवार वय २९ वर्षे, रा.केडगाव, ता.दौंड, जि.पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांनी गुन्हयातील चोरीचा माल आमजद पाशामियाॅ खान वय ४० वर्षे, रा. साईनगर, कोंढवा, ता.हवेली, जि.पुणे यास विकल्याचे सांगितले वरील चार ही जणांना गुन्ह्याचेकामी ताब्यात घेण्यात आले असुन त्याचेकडुन ७६७५०रूपये किमतीच्या ३५०किलो तांब्याच्या तारा जप्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच इतर आरोपींकडुन गुन्हयात वापरलेल्या दोन मारूती ८०० कार, एक पॅशन प्लस मोटार सायकल व चार मोबाईल असा १६०,००० रूपये किमतीसह एकुण ३,३६,७५० रुपयांचा मुददेमाल जप्त करणेत आलेला आहे.
या संशयित आरोपींना अपर सत्र न्यायालय बारामती यांनी ३ दिवस पोलीस कोठडी दिली आहे .
पकडण्यात आलेल्या संशयित आरोपी पैकी अशोक शिंदे रा.राहु थोरली विहीर, ता.दौंड, जि.पुणे हा सराईत गुन्हेगार असुन तो २६ गुन्हयांमध्ये निष्पन्न झालेला फरार आरोपी आहे .
ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पो.हवा. निलेश कदम, गुरू गायकवाड, . गणेश कर्चे, अक्षय यादव, . रामदास जगताप, प्रविण चैधर, मारूती बाराते, . सचिन गायकवाड, सुनिल कोळी, पोलीस मित्र निलेश चव्हाण यांनी केली आहे.