बारामतीतील रिअल डेअरीचे मालक मनोज तुपे सह अन्य तीन जणांवर फसवणूक प्रकरणी दौंड पोलिसांत गुन्हा दाखल…
शातांई डेअरीसह शेतकऱ्यांची मोठी फसवणूक
दौंड(BS24NEWS)
बारामती येथील डेअरी व्यवसायिक मनोज कुंडलीक तुपे, अनिता मनोज तुपे, मॅनेजर शिर्के (पुर्ण नाव माहीत नाही)सिक्युरीटीचे अधिकारी नवनाथ जगताप (सर्वजण रा. बारामती ता. दौंड जि. पुणे) यांच्या विरोधात दौंड पोलिसातफसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी वासुंदे (ता. दौंड) येथील दुग्ध व्यावसायिक हनुमंत म्हस्कू जांबले (रा. वासुंदे ता. दौंड जि. पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,वासुंदे (ता. दौंड) येथे 2007 पासून जांबले यांचा शांताई नावाने दूध संकलन करण्याचा व्यवसाय चालु आहे. त्यानंतर 2013 सालापासून शितकरण करण्यास सुरवात केली व सदरचे दूध हे सोनाई, नेचर, शिवप्रसाद, रियल अशा विविध डेरींना संकलित केलेले दुध पाठवित आहेत. दि. 25 फेब्रुवारी 2022 पासुन शांताई डेअरी यांनी बारामती येथील रियल डेअरी यांना सुट्टे दुध टॅकर मधुन पाठवण्यास सुरुवात केली त्याचे पैसे सुरवातील दोन दोन दिवसांनी नंतर चार पाच दिवसांनी व पुन्हा दहा दिवसानी शांताई इन्टरप्रायझेसच्या अकाउंट वर पाठविण्यास सुरवात केली. त्यानंतर दि.01/06/2022 ते दि.13/06/2022 या दरम्यान एकून आम्ही 23 टँकरमधुन एकून 3,66,836 लिटर दूध त्याची एकून किंमत 1कोटी 26लाख 93हजार 560 रुपये किंमतीचे दुध त्यांना पाठवण्यात आले होते. त्या पगारापोटी त्यांनी 60 लाख रूपये शांताई एन्टरप्रायझेसच्या खात्यावर पाठविले आहेत. व त्यांच्याकडून शांताई दुध संकलन केंद्रास 66 लाख 93हजार 560 रूपये हे येणे बाकी असुन ही थकित पगार बिल देण्यास टाळाटाळ करत आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गटकुळ करित आहेत.