धक्कादायक – दौंडमध्ये बीएसएनएल ऑफीसच्या वॉचमनचा खून.
दौंड(BS24NEWS) दौंड शहरातील बीएसएनएल ऑफीसच्या वॉचमनचा खुन झाला असल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयत प्रकाश ठाकुरदास सुखेजा ( वय ६०, रा.बीएसएनएल वसाहत, पोस्ट ऑफीस जवळ,दौंड) हे बीएसएनएल ऑफिस व वसाहत या ठिकाणी म्हणून वॉचमन म्हणून गस्त घालण्याचे काम करीत असत.
२६ जुलै रोजी अडीच वाजण्याचा सुमारास मयत प्रकाश सुखेजा हे नेहमीप्रमाणे बीएसएनएल ऑफीस व वसाहत परिसरात रात्रीची गस्त घालत असताना दोन ते तीन अनोळखी चोर हे बीएसएनएल ऑफीस मधील वायरची चोरी करून घेवुन जात होते. या चोरांनी मयत प्रकाश सुखेजा यांच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केली असल्याची घटना घडली आहे याबाबात मुलगा मनोज प्रकाश सुखेजा (वय ३६, रा.बीएसएनएल ऑफीस वसाहत, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दौंड पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन याप्रकरणी पुढील तपास दौंड पोलिस करीत आहेत.