आरोग्यपुणे जिल्हा ग्रामीण
दौंड मध्ये शेतात सापडला औषधांचा साठा..
दौंड(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील मूळ गार या गावातील शेतात उघड्यावर औषधांचा साठा आढळून आला आहे. मुदत बाह्य औषधे नष्ट करण्याचे नियमच पायदळी तुडवत ही औषधे उघड्यावर आढळून आली आहेत .गावातील काही गावकऱ्यांनी ही घटना उघडकीस आणली आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे या औषधांमध्ये मुदत संपण्याच्या अगोदरच्या टॅब्लेटची बंद पाकिटे देखील आढळून आली आहेत .
इतर वेळी सर्वसामान्य नागरिक औषधे घेण्यासाठी गेला तर त्याला मात्र औषधे संपले असल्याचे सांगीतले जात असते माञ मुदत न संपलेली औषधे फेकुन दिली जात असल्याने याबाबात नागरिकांकडून आरोग्य विभागाचे वाभाडे काढले जात आहे. याप्रकरणी तात्काळ लक्ष देवुन संबधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.