पुणे जिल्हा ग्रामीणराजकीय
मनसेच्या दौंड शहराध्यक्षपदी संदिप बोराडे
दौंड(BS24NEWS)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दौंड शहराध्यक्षपदी संदिप बोराडे यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सुधिर पाटसकर यांच्या हस्ते बोराडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, मंगेश साठे, राजु चातू, अझर कुरेशी, नंदकिशोर मंत्री आदी पदाधिकारी उपस्थित होते.