खाण उद्योग वन्यजीवांच्या मुळावर, वासुंदे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकाराचा मृत्यू…
वासुंदे(BS24NEWS)
दौंड तालुक्यातील वासुंदे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका चिंकाराचा आज (दि.२) रोजी मृत्यू झाला आहे. या परिसरात चिंकारा जातीच्या हरणाचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. यापूर्वी ही रस्ते अपघातात अनेक वन्यप्राण्यांचे मृत्यू झाले आहेत असल्याचे येथील स्थानिक सांगतात. मात्र प्रशासनास माहिती कळविण्यासाठी वनविभागाची कोणतीही सक्षम यंत्रणा कार्यरत नसल्याने वन्यप्राणी प्रेमीमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
वनविभागाच्या वतीने अपघातग्रस्त वन्यजीव रक्षणासाठी हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्याची तसेच महामार्गावर फलक लावण्याची मागणी वन्यप्रेमी करीत आहेत.
रस्ते अपघातामध्ये वन्यजीव मोठ्या प्रमाणात जीव गमावत आहेत मात्र अनेक वेळा अपघातामध्ये वन्यजीवांना मोठी इजा निर्माण होते. परंतु उपचाराविना अनेक वन्यजीवांना आपला प्राण गमावावा लागत आहे.
वन्यजीवांच्या अपघातांची माहिती देण्यासाठी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांना वारंवार संपर्क साधाला तरी कसलाच प्रतिसाद मिळत नसल्याने वन्यजीव प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वनविभागाची सर्वच यंत्रणा निष्क्रिय बेजबाबदार पणा पध्द्तीने वागत असेल तर वनविभागाच्या धोरणास कर्मचारीच हरताळ फासत असल्याचे चित्र दौंड तालुक्यात पहायला मिळत आहे. यावरून असे स्पष्ट दिसून येते की कुपंनच शेत खातेय मात्र याची वरिष्ठ काय दखल घेतात हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.