आरोग्यदुत आमदार राहुल कुल यांच्यामुळे जन्मजात अपंग असणाऱ्या १३ वर्षाच्या मुलावर झाली मोफत शस्त्रक्रिया
कांचन कुल यांनी घेतली भेट
दौंड(BS24NEWS)
भांडगाव (ता. दौंड) येथील सीताराम शेळके यांचा मुलगा वैभव शेळके (वय वर्षे १३) याला जन्मजात असलेल्या अस्थिव्यंगामुळे स्वतःच्या पायावर चालत येत नव्हते . आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या या शेतमजूर कुटुंबाला पैशाअभावी त्याचे उपचार करणे शक्य होत नव्हते . या परिस्थितीमध्ये त्यांनी दौंडचे आमदार अ़ॅड. राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला व मदतीची विनंती केली. आमदार अ़ॅड. राहुल कुल यांच्या प्रयत्नांतून पुण्यातील एका नामांकित रुग्णालयामध्ये वैभव शेळकेची ४ लाख रुपये खर्चाची शस्त्रक्रिया संपूर्णपणे मोफत करण्यात आली. उपचारानंतर वैभव पहिल्यांदा त्याचा पायावर उभा राहिला आहे.
आमदार राहुल कुल यांच्या पत्नी आणि भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल यांनी नुकतीच वैभव शेळके याची भेट घेऊन त्याच्या तब्बेतीची विचारपूस केली. यावेळी आमदार राहुल कुल यांनी केलेल्या मदतीमुळे आमचा मुलगा त्याच्या पायावर उभा राहणार असल्याने आमदार कुल यांचे आभार त्यांनी पत्नी कांचन कुल यांच्याकडे व्यक्त केले.